एखाद्या पक्षाच्या नेत्याला टार्गेट करण्यात येते तेव्हा त्याचा समाचार घेण्यासाठी पक्षाची सगळी यंत्रणा कामाला लागते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी याला अपवाद आहेत. बांगलादेशातील सलाह उद्दीन शोएब चौधरी हा पत्रकार गेले काही दिवस त्यांच्याविरोधात एकापेक्षा एक असे गंभीर आरोप करतो आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी त्यांचे कनेक्शन असल्याचे सांगतो तरीही काँग्रेस कडून त्याचा चकार शब्दाने निषेध होत नाही, त्याबाबत खुलासा होत नाही, कार्यकर्ते-नेते रस्त्यावर उतरत नाहीत, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करीत नाहीत. चौधरीने केलेल्या आरोपांपेक्षा काँग्रेस नेत्यांचे मौन जास्त गंभीर आहे. काँग्रेस नेते सोनिया गांधीवर होणाऱ्या भडीमाराला अनुल्लेखाने टाळत असल्यामुळे हा सगळा मामलाच प्रचंड गूढ-गंभीर बनला आहे. यातून सोनिया गांधी यांच्या भोवती असलेले गुढचेचे वलय अधिकच गडद झालेले आहे.