कोव्हिड १९ ह्या आजारामुळे अनेक समस्यांचा सामना सामान्य जनतेला करावा लागतो आहे. त्यातच रेमडेसेवीर ह्या औषधाचा तुटवडा आणि त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ ह्याला जनता पुरती कंटाळली आहे. ह्या इंजेक्शनची खरंच गरज आहे का? त्याचबरोबर कोव्हिड लसींबाबत अपप्रचार आणि मुद्दाम निर्माण केले जाणारे गैरसमज ह्या सगळ्याबाबत डॉ. नीलिमा क्षीरसागर ह्यांनी न्यूज डंका सोबत नुकतीच चर्चा केली. स्वतः फार्माकोलॉजिस्ट असलेल्या निलिमाजींनी केईएम हॉस्पिटलच्या पूर्व संचालक त्याचबरोबर स्टेट हेल्थ युनिव्हर्सिटीच्या माजी व्हाईस चान्सेलर पदाची धुरा सांभाळली. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेडिकल समित्यांची जवाबदारी निलिमाजींनी यशस्वीपणे पेलली.
कोव्हिड-१९ आजार, लसींबाबत असलेले गैरसमज आणि घ्यावयाची काळजी ह्याबद्दलची सविस्तर चर्चा ऐकण्यासाठी आमची ही मुलाखत नक्की पहा.