भारतातील युवकांना राजकारणाबद्दल आकर्षण आहे. पण राजकारणाबद्दल काही समज-गैरसमज असल्यामुळे त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून हे प्रयत्न होत आहेत. सुशिक्षित राजकारणी ही ती संकल्पना आहे. यासंदर्भात भारतीय छात्र संसदेचे संकल्पक आणि संस्थापक राहुल विश्वनाथ कराड यांची ही प्रकट मुलाखत. १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत कोथरुड, पुणे येथे ही संसद भरत आहे.