ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी न्युज डंकाला दिलखुलास मुलाखत दिली आहे. एका छोट्याशा गावातील सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा ते एका महत्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष हा कठीण पण तितकाच प्रेरणादायी प्रवास त्यांनी उलगडला. स्वकष्टाने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणाऱ्या उत्तमरावांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घडामोडी या निमित्ताने उलगडल्या.
चित्रकार होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे उत्तमराव शिल्पकलेकडे कसे वळले? त्यांचे बालपण आणि महाविद्यालयीन आयुष्य कसे होते? त्यांनी घडवलेले पहिले शिल्प कोणते? त्यांना शिल्पकार आणि माणूस म्हणून घडवणारे लोक आणि प्रसंग कोणते? या सगाळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे उत्तम पाचारणे यांनी दिली आहेत. उत्तम पाचारणे यांची ही मुलाखत म्हणजे आपल्या कतृत्वाच्या जोरावर असामान्य उंची गाठणाऱ्या एका सामान्य माणसाची कहाणी आहे.
पराग नेरूरकर यांनी ‘न्युज डंका’ साठी उत्तम पाचारणे यांची मुलाखत घेतली असुन ही मुलाखत २४ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत चार भागात प्रदर्शित केली जाणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या मुलाखतीचे उर्वरीत तीन भाग पुढील दोन दिवसांत ‘न्यूज डंका’ वर प्रदर्शित केले जाणार आहेत.