बिमल केडिया हे केशव सृष्टीचे कार्यकारीणी सदस्य आणि केशव सृष्टी ग्राम विकास योजनेतील मार्गदर्शक आहेत. पालघर जिल्ह्याच्या ७५ गावांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित ग्रामविकास योजने अंतर्गत काम चालू आहे. गेल्या काही काळात या गावांतील पाणी, रोजगार, महिला सक्षमीकरण, संस्कार केंद्र इत्यादी माध्यमांतून परिवर्तन घडविण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. बांबू हस्तकलेसारख्या कलांना विकसित करून स्थानिक तरूण- तरुणी, महिलांना रोजगार मिळावा आणि हा भाग बांबू हस्तकलेच्या निर्यातीचे मोठे केंद्र बनावा यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत. याबरोबरच येथील शेतीला पाणी मिळावे, तयार मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत. या विविध कामांत शहरी मुलांचा सहभाग देखील वाढता राहिला आहे. या ठिकाणी शहरी भागातील तरूण मोठ्या प्रमाणात दरवर्षी फळझाडे लावतात. या झाडांपासून स्थानिकांना उत्पन्न देखील मिळतं. या सर्व योजनांबाबत श्री. बिमल केडिया यांची न्युज डंकाचे संपादक श्री. दिनेश कानजी यांनी घेतलेली सविस्तर मुलाखत