पंडित रूपक कुलकर्णी हे प्रसिद्ध बासरी वादक आहेत त्यांचे गुरु अर्थात त्यांचे वडील पंडित मल्हारराव कुलकर्णी हे देखील प्रसिद्ध तबलावादक आणि त्याबरोबर बासरीवादक देखील होते. आपल्या वडिलांकडे काही काळ तबलावादन शिकल्यावर रूपकजी यांनी बासरीवादनाला सुरुवात केली. आपल्या वडिलांकडूनच बासरीचे प्राथमिक धडे गिरवले, नंतर त्यांनी पुढील शिक्षण त्यांनी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडून प्राप्त केले. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ते पहिले गंडाबद्ध शिष्य बनले. आपल्या तबलावादक ते बासरीवादक या प्रवासाबद्दल पंडित जी या मुलाखतीत मनमोकळेपणाने सांगत आहेत. पहा पंडित रूपक कुलकर्णी यांची दिलखुलास मुलाखत!