निवृत्त ले.जनरल डी.बी.शेकटकर यांनी चीन आणि पाकिस्तानच्या समस्येवर केलेले खणणीत भाष्य. भारत कसा संपवू शकतो शेजा-यांचा उपद्रव.
वाचा मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी घेतलेली सविस्तर मुलाखत फक्त न्यूज डंकावर.
शत्रू देशांच्या तुलनेत संरक्षण सज्जतेच्या बाबतीत भारत कुठे उभा आहे?
भारताला धोका फक्त बाह्य आक्रमणांचा नाही. परकीय शक्तींना देशांर्गत शत्रूंकडून नेहमीच सहाय्य मिळत राहीले आहे. मोहम्मद गझनवीच्या काळापासून ही समस्या कायम आहे. आपल्याला देशांगर्त आणि बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने ठोस आणि सुसंगत धोरणाची गरज आहे.
भक्कम सुरक्षा असलेला देश, सुरक्षित असतोच असे नाही. आपण अमेरीकेवर झालेला ९/११ चा हल्ला याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे मोठा देश, मोठे सैन्य म्हणजे सुरक्षा या गैरसमजातून बाहेर यायला हवे. अंतर्गत सुरक्षा आणि सैन्य यात उत्तम ताळमेळ असेपर्यंत देश सुरक्षित राहू शकत नाही.
मोठा भूभाग आणि मोठे सैन्य असल्यामुळे चीनबाबत असाच बागुलबुवा उभा केला जातो. जगात अंतर्गत समस्या नाही, अशी व्यक्ति नाही, संस्था नाही आणि देशही नाही. ही वास्तविकता आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. चीन आणि पाकिस्तानने अशाच कमतरतांचा अभ्यास करून आजवर भारताला ठोकले आहे. १९६२ पासून सातत्याने चीनने आपली जमीन घेतली, २०१४ पासून यात थोडे परीवर्तन व्हायला सुरूवात झाली. पाकिस्तानबाबतही हीच परीस्थिती आहे. आज हे दोन्ही देश एकत्र येऊन भारताला त्रास देतायत.