छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर होण्यासाठीचा पाया पहिल्या बाजीराव पेशव्यांनी घातला. केवळ घोडदळाच्या आधारे ४० लढाया केलेला मराठ्यांचा हा ईश्वरदत्त सेनापती, केवळ शिपाईगडीच नव्हता, तर एक उत्कृष्ट राजकारणी देखील होता. त्याची अवघी २० वर्षांची कारकिर्द मराठ्यांसाठी अतिशय वादळी ठरली. २८ एप्रिल १७४० या दिवशी रेवा तीरावर रावेर या ठिकाणी राऊंचे निधन झाले. मस्तानीच्या पलिकडचे बाजीराव कसे होते ते ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जयराज साळगावकर यांच्याकडून जाणून घेऊ.