भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये २०१८ साली पाच बिलियन अमेरिकी डॉलरचा ‘ब्रह्मास्त्र’ म्हणवल्या जाणाऱ्या आधुनिक अशा S-400 मिसाईल्सचा करार झाला होता. रशियाच्या S-400 च्या जागी भारताने आपल्याकडची हवाई संरक्षण प्रणाली पॅट्रियट खरेदी करायला हवी, अशी अमेरिकेची इच्छा होती. भारताने अमेरिकेची हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करायला नकार दिला. भारताच्या या भूमिकेमुळे अमेरिकेच्या CAATSA निर्बंधांचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे भारतावर पण अमेरिका निर्बंध लादेल अशी शक्यता होती, मात्र आता अमेरिकेने भारताला या निर्बंधांमध्ये सूट दिलीये.