पद्म पुरस्कार म्हणजे भारतीयांच्या कार्याची सरकारने घेतलेली दखल. पण ह्यावर्षी आपण थेट जपानच्या पूर्व पंतप्रधानांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. तुम्हाला खरं वाटणार नाही पण भारताच्या अनेक परराष्ट्रीय उद्दीष्टांना सत्यात उतरवण्यासाठी मोदींना मदत करायला आबे नेहमीच पुढे असायचे. अगदी बुलेट ट्रेन पासून चीनचे हिंदी महासागरातील वर्चस्व असू दे आबे आणि मोदींच्या ह्या खास मैत्रीने सगळीच संकट एकत्र पेलली.
टू प्लस टू डायलॉगच्या माध्यमातून जपान आणि भारत हे देश आशियातील दोन शक्तिशाली सत्ता म्हणून पुढे येत आहेत. २०१९ मध्ये झालेल्या जपान आणि भारतातील उच्चस्तरीय टू प्लस डायलॉग मध्ये दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्रीय मंत्री स्वतः उपस्थित होते. ह्या बैठकी दरम्यान एक महत्वाचा ठराव मान्य करण्यात आला ज्यामुळे इंडो-पॅसिफिक धोरणात नवी दिल्ली आणि टोक्योची भूमिका आणखीनच मजबूत झाली. अक्विसिशन अँड क्रॉस सर्विसिंग ऍग्रीमेंट द्वारे जपानने भारतातील अंदमान निकोबार येथील लष्करी तळावर तर भारताने जपानच्या दीजिबुती येथील नौदलीय तळावर राखीव हक्क मिळवले.
आशियात बॅलन्स ऑफ पावर राखण्यासाठी आबेंनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या इंडो पॅसिफिक धोरणाने विचारवंतांना एक दिशा दिली. जपानच्या अर्थ राजकारणापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत आबेंचा असलेला दबदबा ह्याने टोक्यो आणि नवी दिल्लीच्या संबंधांना दिशा दिली. म्हणूनच त्यांच्या कामाची सविस्तर माहिती आणि भारताच्या अंतर्गत विकास मुद्यांपासून ते परराष्ट्रीय धोरणा बाबतच्या ध्येयांपर्यंत त्यांनी भारताला केलेली मदत सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की बघा..