आजाराचं निदान वेळेत झालं नाही तर सहसा रुग्णाला वेदनादायी आयुष्य जगावं लागतं आणि अनेकदा मृत्यूलासुद्धा सामोरं जावं लागत, असा आजार म्हणजे कर्करोग. या आजाराचे काही अपवादात्मक प्रकार वगळले तर कर्करोगावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. केमोथेरेपीसारखे उपचार आहेत पण हे उपचार बहुतांशवेळा वेदनादायी आणि इतर दुष्परिणाम करणारे ठरू शकतात. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की कर्करोग झाला या विचारानेच रुग्णांचं मनोधैर्य खचतं. पण यादरम्यान आता एक सकारात्मक माहिती समोर आलीये. डॉस्टरलिमॅब नावाचं औषध आता कॅन्सरवर परिणामकारक ठरत असल्याची माहिती संशोधनातून समोर आलीये. आता हे औषध काय आहे? यावर संशोधन कसं झालं हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.