कोलमडलेली अर्थव्यवस्था, अस्थिर राजकीय वातावरण या संकटांचा सामना करणारा पाकिस्तान आता PoK मध्ये (Pakistan Occupied Kashmir) सुरू असलेल्या आंदोलनाच्या संकटाचा देखील सामना करत आहे. पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेमध्ये लोकांना स्वातंत्र्य हवंय. पीओकेमधले काश्मिरी तरुण पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधात घोषणा देतायत. हे आंदोलन इतकं तीव्र आहे की लोक ‘आझादी आझादी’ आणि ‘पाकिस्तान सरकार मुर्दाबाद’च्या घोषणा देत आहेत.