अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनला मदत करणारा, अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल जवाहिरीचा अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये ड्रोन हल्ला करत खात्मा केलाय. ३१ जुलै २०२२ या दिवशी अमेरिकेने अफगाणिस्तानचं राजधानीचं शहर असलेल्या काबूलमध्ये ड्रोन हल्ला करत जवाहिरीला ठार केलंय. जवाहिरीला मारून अमेरिकेने बदला घेतलाय पण याचा फायदा फक्त अमेरिकेलाच झालाय असं नाहीये तर त्याचा फायदा भारतालाही झालाय.