भारताने ताजिकिस्तानला ५० खाटांचं म्हणजेच बेड्सचं भारत-ताजिकिस्तान फ्रेंडशिप हॉस्पिटल सुपूर्द केलंय. भारताने निर्माण केलेलं हे भारत-ताजिकिस्तान फ्रेंडशिप हॉस्पिटल आता ताजिकिस्तान यंत्रणेकडून चालवलं जाणारे. ताजिकिस्तान मधले डॉक्टर आणि कर्मचारीही हे हॉस्पिटल भारतीय यंत्रणांप्रमाणे उत्तम प्रकारे चालवतील असा विश्वास भारताने व्यक्त केलाय. २०१३ साली ताजिकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये भारत-ताजिकिस्तान फ्रेंडशिप हॉस्पिटल संबंधी करार झाला होता. त्यानंतर या सामंजस्य कराराच्या आधारावर ऑक्टोबर २०१४ मध्ये भारत-ताजिकिस्तान फ्रेंडशिप हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं होतं. आज या रुग्णालयात ENT, ऑपरेशन विभाग, बालरोग, स्त्रीरोग, दंत विभाग असे अनेक विभाग कार्यरत आहेत.