कम्युनिस्ट विचारसरणीचा ऐतिहासिक अश्या बालेकिल्ल्यातून म्हणजे सोव्हिएत महासंघातून बाहेर पडल्यानंतर अनेक देश हे लोकशाही की हुकूमशही अश्या संभ्रमात अडकले. किर्गिझस्तान, बेलारुस आणि मॉलडोवा ह्या देशांमधील राजकीय अस्थिरता अजूनही चालत असलेल्या कम्युनिस्ट पद्धतीबद्दल बरेच काही सांगून जाते. वेगवेगळ्या मार्गांनी हे तिन्ही देश लोकशाही राबवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण आतापर्यंत एकाही देशाला ह्यात सफलता मिळाली आहे असं म्हणणं गैरच ठरेल.
ह्या सोव्हिएत संघाचा भाग असलेल्या देशांमध्ये नक्की चालंलय तरी काय? असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो. भाषेतील फरक आणि माहितीच्या साधनांचा पुरेसा अभाव ह्यामुळे ह्या देशांतील संस्कृती, राजकारण समाज ह्या विषयी आपल्याला नेहमीच आकर्षण असते. सोव्हिएत संघातून बाहेर पडलेल्या तीन देशांना सध्या राजकीय अस्थिरतेने ग्रासले आहे. सोविएत संघातून स्वतंत्र झाल्यावर ३० वर्षांनी देखील येथील नेते सामाजिक सुव्यवस्था निर्माण करण्यात कमी पडले आहेत. कम्युनिस्ट सत्तेतून आलेला हुकूमशाही स्वभाव हा लोकशाहीच्या माध्यमातून ह्या देशांमध्ये सध्या राबवला जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणूका आणि त्यानंतर उफाळून आलेला सामाजिक असंतोष त्याचीच ग्वाही देतात. मॉलडोवा, बेलारूस आणि किर्गिझस्तान ह्या पुर्व सोव्हिएत देशांमधील राजकीय अस्थिरतेबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील व्हीडिओ नक्की पहा.