समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ या वर्षातल्या पहिल्या चार महिन्यांतच श्रीलंकेला कर्ज देणाऱ्या देशांमध्ये सर्वात वरचा क्रमांक भारताचा असल्याचं स्पष्ट झालंय. आकडेवारीनुसार या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्येच भारताकडून श्रीलंकेला तब्बल ३७ कोटी अमेरिकन डॉलर्सहून जास्त रक्कम कर्ज म्हणून मिळाली आहे. टक्केवारीमध्ये पाहिल्यास तब्बल ३९ टक्के रक्कम ही एकट्या भारताकडून आली आहे. त्यामुळे जगभरातील इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये श्रीलंकेला सर्वाधिक मदतीचा हात भारताकडूनच मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.