भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये झालेला एक प्रमुख करार म्हणजे सिंधु जल करार. पाकिस्तान आणि भारत यांचे संबंध कायमच तणावपूर्ण राहिलेले आहेत. पण तरी हा करार अजून टिकून आहे. २३ मार्च २०२१ रोजी याच सिंधु जल करारावर दोन्ही देशांमध्ये बैठक झाली. १९६० साली झालेला हा करार आणि १९६० पासून २०२१ पर्यंत तब्बल ११६ बैठका या कराराबद्दल झालेल्या आहेत. सिंधू जल करार म्हणजे काय? त्याने कोणाला फायदा झालाय? या करारामागची पार्श्वभूमी काय आहे? याविषयी या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे.