भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने कोविड परिस्थिती किती प्रभावीपणे हाताळली आहे आणि कोविडच्या या महाभयंकर महामारीनंतरही भारत विश्वगुरू बनण्याकडे वाटचाल करत आहे याचा लेखाजोखा ‘न्युज डंका’ चे सल्लागार संपादक आमदार अतुल भातखळकर यांनी ‘भारताची वॅक्सिन संजीवनी’ आपल्या व्हिडिओ मधून मांडला आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अतुल भातखळकर यांनी भारताचा हा अभिमानास्पद आणि यशस्वी प्रवास उलगडला आहे.
आजपासून तब्बल दहा महिन्यांपूर्वी जगभरातील पत्रकार आणि माध्यमे कोरोनाच्या निमित्ताने भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत होते. पण आता हीच सगळी माध्यमे भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढाईचे कौतुक करत आहेत. आज एकीकडे अनेक पाश्चिमात्य देशात रोजची रुग्णसंख्या वाढत असताना भारतात मात्र ती रूग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. भारताने प्रयत्नपूर्वक लसनिर्मितीतही आत्मनिर्भरता दाखवत एक नाही तर तब्बल दोन लसींची निर्मिती केली आहे. भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
भारत एवढ्यावरच थांबला नसून आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संस्कृतीला जागत नेपाळ, भूतान, बांगलादेश इतकच नाही तर भारतीय उपखंडाबाहेर ब्राझील सारख्या देशांनाही आपण लस पाठवली आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्सला ही ‘डिप्लोमसी’ वाटत असली तरी भारतासाठी मात्र ही ‘वॅक्सिन मैत्री आहे. अतुलजींच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रवासाचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे.