आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात अराजक सदृश्य परीस्थिती निर्माण झाल्यानंतर पतंपधान शेख हसीना यांना देशातून पलायन करावे लागले. तुर्तास त्या भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत. बांगलादेशात उसळलेला हिंसाचार, अस्थिरता आणि त्यामुळे भारत-बांगलादेश सीमेवर निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सद्य़स्थितीबाबत उपस्थितांना माहीती दिली. या बैठकीत बांगलादेशात झालेल्या अराजकामागे परकीय हात आहे काय? असा सवाल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. हा प्रश्न अत्यंत धारधार आहे.