राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजपा सरकारला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे पवार महाराष्ट्रातही भाजपासोबत येणार अशी चर्चा सुरू आहे. माझा पक्ष आणि माझा फायदा हा पवारांच्या राजकारणाचा मूलमंत्र आहे. एनडीपीपीला पाठींबा देण्याचे तेच कारण आहे, ज्या कारणासाठी पवारांनी भाजपाला २०१४ मध्ये पाठींबा दिला होता.