भारतात सुरू झालेल्या दोन महत्वाच्या महाप्रकल्पांना काँग्रेस आणि काँग्रेसच्या इको-सिस्टीमने विरोध करायला सुरूवात केलेली आहे. हे दोन्ही प्रकल्प भारताला नवी आर्थिक उंची मिळवून देणारे आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही हे प्रकल्प महत्वाचे आहेत. सगळ्या महत्वाचे म्हणजे या दोन्ही प्रकल्पांमुळे चीनचे नुकसान होणार आहे. काँग्रेसची इको सिस्टीम ‘मोदी ०.३’ मध्ये नेमके काय घडवण्याच्या तयारीत आहेत, हे या घडामोडींकडे पाहील्यानंतर सहज लक्षात येऊ शकते. अवघ्या देशाने विशेषत: तरुणाईने सावध व्हावे असा हा घटनाक्रम आहे.