मराठी चित्रपट/रंगभूमी/छोटा पडदा अशा तीनही माध्यमातून चाळीसपेक्षा जास्त वर्ष कार्यरत असलेल्या विजय कदमने ‘खुमखुमी’तून खूपच मोठी झेप घेतली आणि मग तेवढ्यावरच न थांबता आता त्याने ‘कदम खोल ‘ हे आणखीन एक नवे पाऊल टाकले. इतक्या मोठ्या यशस्वी वाटचालीनंतरही नवीन गोष्टी शिकण्याची त्याची प्रवृत्ती आजही कायम आहे.
श्री विजय कदम सर जी मी तुमची पूर्ण मुलाखत ऐकली. आणि बघितली.👌👌👌👌👌👌👌👌ती पूर्ण ऐकून मला खूप चं भारी वाटलं. असं मनापासून वाटत होतं की तुमचं बोलणं संपूच नये.. मराठीभाषेवरील तुमचं प्रभुत्व उल्लेखनीय आहे. आणि आज च्या काळात काळानुसार तुम्ही स्वतःत केलेले बद्दल. सतत शिकण्याची तुमची वृत्ती. त्यामुळे खरोखरचं डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हंटल्या प्रमाणे मी आजन्म विद्यार्थीचं राहील. हे तुम्ही खऱ्या अर्थाने सिद्ध केले आहे.. हाच तुमचा अनमोल ठेवा आहे की सतत बदलत्या परिस्थिती नुसार स्वतःत बद्दल करणे. नवीन गोष्टी सतत शिकत राहणे. आणि स्वतःला झोकून देऊन काम करणे ह्यामुळेच तुम्ही सर जी मराठी, हिंदी कलाक्षेत्रातील वटवृक्ष आहात. प्रत्येक्ष सरस्वती तुमच्या वाणीत आहे. तुम्हाला ऐकताना प्रत्येकवेळी ते जाणवत होते. फक्त नव्या पिढीतीलचं नाही तर जेष्ठ कलाकारांनी हि तुमच्या कडून शिकावं एवढ कलेचं भांडार तुमच्या कडे आहे. असं म्हणतात की धनाची देवता कुबेर आहे परंतु अभिनय क्षेत्रात अभिनयाची देवता म्हणून तुम्हाला बोललो तर ते अजिबात चुकीचं ठरणार नाही. कारण एवढा अनुभव तुमच्या कडे आहे. तुमच्या कार्याला माझा सलाम. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻लेखक अनिल बाबुराव शिंदे