नागपूरच्या दंग्यामध्ये महीला पोलिसांचा विनयभंग झाला. पोलिसांवर हल्ले करण्यात आले, हा सगळा तपशील ऐकल्यानंतर मुंबईत २०१२ मध्ये झालेल्या दंग्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दंगेखोरांना कुरवाळण्याच्या राजकीय परंपरेमुळे देशात पुन्हा पुन्हा दंगे होतात. आझाद मैदानात २०१२ साली झालेल्या दंग्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने झालेल्या नुकसानीची वसूली मोर्चाच्या आयोजकांकडून करण्याचे आदेश दिले होते. परंतु तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारला दंगेखोरांबाबत इतके ममत्व होते की ही रक्कम ३६ लाखांपर्यंत कमी करण्यात आली. तीही आजतागातय वसूल करण्यात आलेली नाही. इतिहासाचे विस्मरण झाले की इतिहासात भोगलेले भोग पुन्हा वाट्याला येतात. दंगेखोरांवर जोपर्यंत वरवंटा चालत नाही तोपर्यंत ते त्यातून धडा घेणार नाही हे