मुंबईत विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघ येणार म्हटल्यावर त्या आनंदात सहभागी व्हायचे सोडून त्यात मिठाचा खडा कसा टाकता येईल यासाठी मविआचे नेते सहभागी झाले. खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी आणलेली बस गुजरातची असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आदींनी राजकारणाचा स्तर आणखी खाली आणला.