कसा झाला अपात्रतेच्या कारवाईचा गेम ???

कसा उठला अपात्रतेच्या कारवाईचा बाजार?| Eknath Shinde | Sanjay Raut | Dinesh Kanji |

संख्याबळ गमावलेल्या महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर पेच काढून सरकार टीकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विधानसभेत तिन्ही पक्ष आणि अपक्ष मिळून १७० आमदारांचा सरकारला पाठींबा होता. परंतु त्यापैकी सुमारे ५० आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला रवाना झाल्यापासून सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे १६ आमदारांना अपात्र करायचे, जेणे करून उर्वरीत आमदार नाक मुठीत घेऊन शरण येतील आणि सरकार वाचेल असा हिशोब करून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी १६ आमदारांना नोटीस बजावली आणि ४८ तासांत नोटीशीचे उत्तर द्यायला सांगितले. या आमदारांना अपात्र केल्यावर सरकार वाचेल असा ठाकरे सरकारचा हिशोब होता. परंतु शिंदे गटाच्या आमदारांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज त्यांच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत महाविकास आघाडीचे सर्व डावपेच उधळले गेले. न्यायमूर्ती सुर्यकांत आणि जे.बी.पारडीवाला यांच्या खंडपीठाने उपाध्यक्षांच्या पत्राला उत्तर देण्याची मुदत १२ जुलैपर्यंत वाढवली. याप्रकरणी उपाध्यक्ष झिरवळ यांनाही सविस्तर प्रतिज्ञापज्ञ दाखल करायला सांगितले आहे. #Eknath Shinde #Sanjay Raut #Dinesh Kanji

Exit mobile version