इराण म्हंटलं कि आपल्याला नैसर्गिक साधनसंपत्ती मुख्यतः तेल आणि नैसर्गीक वायू ने संपन्न देश असा मुस्लिम बहुल देश डोक्यात येतो. पण मागच्या दोन महिन्यापासून चर्चेत असलेला हा देश फक्त वाईट बातम्याच जगभरात देऊ शकला आहे. इराणचे पंतप्रधान इब्राहीम रईसी यांच्या “अपघाती” मृत्यूनंतर उदारमतवादी नेते डॉ. मसूद पजेश्कियन पंतप्रधान झाले. ज्यामुळे इराण-अमेरीका आणि इतर पश्चिम देशांसोबत त्यांचे संबंध सुधारतील असा विश्वास बऱ्याच पंडितांनी वर्तवला होता.