यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद हे टोकियो, जपानकडे आहे. खरतर २०२० मधेच ही स्पर्धा होणार होती परंतु कोरोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. १९६४ साली सुद्धा ऑलिम्पिक स्पर्धा ही जपानमध्ये होती आणि १९४० सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद देखील जपानकडे होते पण दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. दुसऱ्या महायुध्याच्या कटू आठवणी या बऱ्याच आहेत आणि जपानकडेतर अधिक जास्त आहेत. याच आठवणींमधून बाहेर येत जपानने प्रगतीच्या मार्गावर भरभराट केली आणि हेच दाखवण्यासाठी जपानने ऑलिम्पिक स्पर्धेचा आधार घेतला.