रीझर्व्ह बँकेने काल सायंकाळी २००० च्या नोटांसंदर्भात महत्वाचा निर्णय जारी केला. ३० सप्टेंबरनंतर या नोटा चलनात राहणार नाहीत, असे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात काळ्यापैशावर झालेला हा दुसरा मोठा प्रहार आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा देशात जबरदस्त खळबळ माजली आहे. विरोधी पक्षातील नेते प्रचंड चिडचिड आणि किरकिर करीत आहे. २०१६ मध्ये मोदी सरकारने नोटबंदी जाहीर केली होती. काल त्याचे पुढचे पाऊल उचलण्यात आले. तो स्वल्पविराम होता, काल पूर्ण विराम लागला आहे. ही धरसोड नाही, हे आधीच ठरले होते.