तोरा संपलाय, नक्षा उतरलाय!

तोरा संपलाय, नक्षा उतरलाय! | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Aditya Thackeray |  Dinesh Kanji

शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधी मंडळ अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डीवचले होते. काल शुक्रवारी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांनी जे भाषण केले, त्याला ठाकरेंना दिलेले उत्तर एवढेच म्हणणे पुरेसे नाही. याला तुडवणे म्हणणेच योग्य आहे. उद्धव ठाकरे यांनी जे काही पेरले ते आता उगवते आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तोरा साफ संपल्याचे संकेत या अधिवेशनाने दिले आहेत.

Exit mobile version