एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्याबरोबर ४० आमदारांनी बंड केलं आणि सत्तेतून बाहेर पडले. बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेला मोठे भगदाड पडले. शिवसेना पक्षदेखील खिळखिळा झाला. त्यानंतर या आमदारांना खोके, बोके, गद्दार अशा नानाविध उपमा उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या शिल्लक नेत्यांनी दिल्या. त्यामध्ये शिवसेनेचे भास्कर जाधव हेदेदेखील होते. परंतु भास्कर जाधव यांनी एक विधान केलेय. ते म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता, हे आजही आणि उद्याही कबूल करेन. या पक्षातून त्या पक्षात जाणं हे कदापीही चांगलं नाही, असे भास्कर जाधव म्हणाले. या विधानाने उद्धव गटात अनेकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील.