आपल्याला आपल्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यायला लागते. विशेषतः २०२० हे वर्ष आपणा सर्वांसाठी कोविड-१९ महामारीमुळे अधिक खडतर ठरले आहे. आता कोविड-१९च्या महामारीतून उभे राहणाऱ्या आपणा सर्वांसाठी अतुल महाजन गुरूजी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत.
ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्रे, राशी या सर्वांबरोबरच अंकांचा देखील विचार केला जातो. अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. अंकशास्त्रातून मुलांक आणि भाग्यांक काढला जातो.
विविध अंकांचे विविध ग्रह स्वामी आहेत. त्या अंकांवर, तो अंक मुलांक अथवा भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींवर त्या ग्रहांची दृष्टी असते. वाहन खरेदी, घर खरेदी, नोकरी, व्यवसाय आणि आपले एकूण करियर इत्यादी ठिकाणी मुलांक कसा प्रभाव टाकतो? मुलांक अथवा भाग्यांक कसा काढला जातो? त्यांचं महत्त्व काय? या अंकांचे सुर्य, चंद्र, गुरू, बुध, मंगळ असे विविध ग्रह स्वामी असतात म्हणजे काय? त्यांची वैशिष्ट्ये कोणती? अशा विविध प्रश्नांची चर्चा अतुल महाजन गुरूजी यांनी या व्हिडीयोमध्ये केलेली आहे.
त्या बरोबरच मुलांक आणि भाग्यांक काढण्याचे गणित देखील महाजन गुरूजी यांनी उलगडून सांगितले आहे.
आपला मुलांक, त्याचा ग्रह आणि त्या ग्रहाची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडियो नक्की पहा.