भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईत आला तेव्हा गुजरातच्या बसवरून टीका करण्यात आली. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ती टीका केली. नंतर मात्र या संघातील चार मुंबईकर खेळाडू परप्रांतीय असल्याचे सांगत त्यांचे कसे योगदान आहे, सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केल्यास कशी प्रगती साधता येते असे उपदेशाचे डोस पाजले.