लोकसभा निव़डणुकीचा आज अखेरचा सातवा टप्पा. आज ५७ जागांसाठी मतदान झाले. सायंकाळी ७ पासून एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील. हे आकडे मतदारांचा कल दाखवतात. वाऱ्याची दिशा दाखवतात. परंतु प्रत्यक्षात निकालाच्या आकड्यांच्या जवळपास जाताना दिसत नाहीत, हे २०१९ मध्ये सिद्ध झालेले आहे. इंडीया टूडे आणि न्यूज२४ चा एक्झिट पोल निकालाच्या जवळपास गेला होता. बाकी सगळे उताणे पडले होते. तज्ज्ञांना निकालाचे ठोस अंदाज बांधता येत नाहीत, असे चित्र वारंवार दिसते आहे. मग ते ओपिनिअन पोल असो किंवा एक्झिट पोल. गेल्या वेळी दहा-बारा एक्झिट पोल पैकी फक्त दोन एजन्सीजचे आकडे जवळपास गेले. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे मोदी-शहा जोडगोळीने गेल्या दहा वर्षांच्या काळात राजकारणाचा बदललेला पॅटर्न आणि मतदारांच्या नव्या फुटपट्ट्या मीडिया लक्षात घेत नाहीये.