प्रचाराची रणधुमाळी काल संपली आणि उद्याच्याला पाचव्या टप्प्याचे मतदान होतं यामध्ये मुंबई सह नाशिक दिंडोरी ठाणे जिल्ह्यातले अशा 13 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जाहीर प्रचार संपला असला तरी आज नेहमीप्रमाणे आपलं रतीब घालत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावासाठी 2019 च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षांनाच विरोध केलेला होता असं आज सांगितलेलं आहे. मग जर का या एका मुद्द्यावरून शिवसेना भारतीय जनता पक्षाचे युती तुटली आणि मग शिवसेनेने महाविकास आघाडी तयार करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती केली तर मग त्या वेळेला त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री का बनवलं नाही हा सर्वात मोठा प्रश्न आज संजय राऊत यांच्या विधानानंतर तयार झालेला आहे. पत्रकार विचारतात म्हणून काहीही बोलायचं आणि ल…