महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात शिउबाठाचे नेते आदीत्य ठाकरे विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलने करण्याचा जन्मसिद्ध अधिकार विरोधकांना आहे. त्यामुळे तो शिउबाठालाही आहे. परंतु महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चे काढताना उद्धव ठाकरे यांनी मातोश्री-२ उभारण्यासाठी पैसा कुठून आला, याचा तपशील लोकांना द्यायला हवा.