तेलुगू फिल्म प्रोड्यूसर गिल्डच्या सदस्यांनी १ ऑगस्ट २०२२ पासून चित्रपटांचे चित्रीकरण केले जाणार नाही, असे जाहीर केले आहे. तेलुगू चित्रपट उद्योगाची फेररचना करण्याच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत तेलुगू फिल्म प्रोड्युसर्स गिल्डने याबाबत सोशल मीडियावर एक निवेदन शेअर केले आहे.
प्रोड्यूसर्स गिल्डने कोविडनंतर चित्रपटांचे वाढते बजेट आणि थिएटरमधून कमी उत्पन्न हे विषय निवेदनात नमूद केले आहे. चित्रपटांच्या खराब कामगिरीबद्दल गेल्या काही आठवड्यांपासून तेलुगू इंडस्ट्रीतील निर्माते चर्चा करत आहेत. चित्रपटाचे बजेट, चित्रपटांचे ओटीटी आणि थिएटरमध्ये रिलीज करणे या सारख्या तेलुगू चित्रपटांशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टीं संदर्भातही निर्माते चर्चा करणार आहेत.
गेल्या १० दिवसांपासून तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील निर्मात्यांमध्ये या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. यादरम्यान अनेकांनी ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तिकिटाचे दर वाढल्यामुळे चित्रपटगृहाकडे कमी लोक वळत आहेत. त्यामुळे सर्व पार्श्वभूमीतील लोकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहता यावेत, यासाठी तिकीटाचे शुल्क कमी करावे, असे प्रोड्युसर काउंसिलचे मत झाले आहे.
हे ही वाचा:
अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी
मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी
महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा सर्वाधिक लाभार्थी!
महामारीनंतर उत्पन्नावर परिणाम
“महामारीनंतरची बदलती उत्पन्नाची परिस्थिती लक्षात घेता, निर्मात्यांनी चित्रपट निर्माते म्हणून ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्या सर्व समस्यांवर चर्चा करणे महत्त्वाचे झाले असल्याचे तेलुगू फिल्म प्रोड्यूसर्स गिल्डने शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१ ऑगस्टपासून शुटिंग थांबवणार
गिल्डने पुढे लिहिले, “आमची इकोसिस्टिम सुधारणे आणि आपले चित्रपट निरोगी वातावरणात प्रदर्शित करणे याची खात्री करणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. या संदर्भात, गिल्डच्या सर्व निर्मात्या सदस्यांनी १ ऑगस्ट २०२२ पासून शूटिंग थांबवले आहे. जेणेकरून आम्हा सगळ्यांना यावर पर्याय शोधता येईल.”