ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना भाजपाच्या पदाधिकारी श्वेता शालीनी यांनी नोटीस बजावली आहे. नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है… असे म्हणतात, ही नोटीस त्याचे उत्तम उदाहरण आहे. राजकारणातील बारकावे अत्यंत परखड आणि प्रभावीपणे मांडून महाराष्ट्रातील लिब्रांडू गँगला उघडे पाडण्याचे काम भाऊ गेली अनेक वर्षे करतायत. ही ती कामगिरी आहे जी, भाजपाच्या नटमोगऱ्यांना जमली झेपली नाही, जे आय़टी सेलला पेलवले नाही. विरोधकांना ठोकणे, त्यांचे नरेटीव्ह रोखणे ज्यांना जमले नाही ते भाऊंचा नाद कुठे करतायत. ते दुकान उघडून थोडेच बसले आहेत?