एरवी महाराष्ट्रातील सगळे उद्योग गुजरातला गेले अशी बोंब ठोकणारे आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटला उत्तर देतील का? फडणवीसांनी ट्विट करत महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक पुन्हा वाढली आहे आणि महाराष्ट्र दुसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे असे म्हटले. गुजरात तर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मग याबद्दल आता ठाकरे काय म्हणणार