आमने-सामने दोन मसीहा शरद पवारांकडे झुकलेले…

आमने-सामने दोन मसीहा शरद पवारांकडे झुकलेले ... | Dinesh Kanji | Sharad Pawar | Jarange Patil |

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील आणि बुजर्ग नेते छगन भुजबळ यांची जुंपली होती, किंवा तसे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्दयामुळे मराठा समाज महायुतीपासून काही प्रमाणात दुरावला. ओबीसी समाजाच्या बाजूने भुजबळ खिंड लढवतायत असे चित्र निर्माण झाले होते. आता तेच भुजबळ घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे. जरांगेंना कोणाचे आशीर्वाद आहेत हे उघडच आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांना सहानुभूती आहे, असे भुजबळ वारंवार का बोलत होते याचाही उलगडा लवकच होण्याची शक्यता आहे. मराठा आणि ओबीसी समाजाचे मसीहा, दोघेही मविआच्या बाजूने कललेले दिसतायत.

Exit mobile version