भाजपाला विरोध करताना काँग्रेसने इतकी खालची पातळी गाठली की पक्षाच्या नेत्यांनी अगदीच तारतम्य सोडले आहे. कोणतेही कारण नसताना काँग्रेसने या राजकीय तंट्यात निमलष्करी दलाला सुद्धा लपटले आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी निमलष्करी दलाच्या ट्रकमधून पैसे पाठवण्यात आले, असा सनसनाटी आरोप काँग्रेसने केला आहे.