महाराष्ट्र विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये आजपासून सुरूवात झालेली आहे. या अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मांडण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा लागू करण्याचा हा निर्णय क्रांतिकारी आहे. लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी हा बॉम्ब ठरण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराला चाप लावणारा हा निर्णय अनेकांना घाम फोडणारा आहे.