विधीमंडळात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. भाजपाकडून या पदासाठी राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक शिवसेनेसाठी दु:स्वप्न ठरण्याची शक्यता आहे. पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास ही निवडणूक म्हणजे केवळ औपचीरीकता आहे, कारण भाजपा-शिवसेना युतीकडे १७० आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे नार्वेकरांची निवड निश्चित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात खरा राडा यानंतरच सुरू होणार आहे. कारण एकदा विधानसभा अध्यक्षाची निवड झाली की शिवसेना कोणाची? हा वाद त्यांच्यासमोर येईल. एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार असल्यामुळे त्यांच्याबाजूने फैसला होणार हे नक्की. असा निर्णय झाला तर उद्धव ठाकरे बरेच काही गमावून बसतील. पक्ष हातून जाईल, निशाणी जाईल आणि पुढे बऱ्याच गोष्टी.