राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मांडीवर बसून अडीच वर्षे महाराष्ट्रात औट घटकेची सत्ता राबवणाऱे उद्धव ठाकरे त्यांच्याकडून काही शिकले नाहीत हेच खरे. कोट्यवधीची वसूली सुरू असताना सत्ता गमावल्याचे दु:ख होणे समजण्यासारखे आहे, हे दु:ख उद्धव यांच्याप्रमाणे पवारांनाही असणारच. पण दोघेही नेत्यांचा व्यक्त होण्याचा अंदाज खूप वेगळा आहे. दोन्ही नेत्यांची शारीर भाषा, वक्तव्य आणि भाजपाबाबतची भूमिका यात जमीन आस्मानाचा फरक आहे.