पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील संपन्न भाग मानला जातो, तसा काही मराठवाड्याचा लौकीक नाही. बीड इथला एक जिल्हा जिथे कोट्यवधी रुपये खर्च करून रश्मिका मंदाना साऱख्या महागड्या स्टार्सना बोलावले जाते. इव्हेंटवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. उत्पन्नाचा कोणताही ज्ञात स्त्रोत नसताना इतका पैसा येतो कुठून हा प्रश्न बीडमध्ये कुणाला पडत नाही, कारण त्यांना उत्तर माहीती आहे, बीड बाहेर मात्र हे एक कोडे आहे. इथे पैशाचा पाऊस पडतो का? तसं काही नाही. हा पैसा राखेच्या ढीगाऱ्यातून येतो, वीटभट्ट्यांच्या धुरातून येतो. हा पैसा अफाट आहे. वाल्मिक कराडसारख्या कधी काळ घरकाम करणाऱ्या पोराला करोडपती बनवण्याची ताकद या काळ्या धुरात आहे.