आमदार गुवाहाटीला गेल्यापासून शिवसेनेत आमुलाग्र बदल होताना दिसत आहे. जे गेल्या अडीच वर्षात घराबाहेर पडत नव्हते ते पक्षनेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत आहेत. सत्ता जातेय ही भावना खूपच वेदनादायी आहे. या वेदना पचायला जड असातात. पोटात मुरडा पडण्याची शक्यता असते. सध्या तरी चित्र तेच दिसते आहे.