शिवसेनेचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वलय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कधीच लाभले नाही. पक्षप्रमुख असताना झाकलेली मूठ मुख्यमंत्री झाल्यानंतर अगदीच उघडी पडली. घरी बसलेला मुख्यमंत्री असा ठपका पडल्याने ठाकरे यांची क्रेझ पूर्वीपेक्षा ढासळली. परंतु आता सत्ता गमावल्यानंतर ठाकरे अधिकच दीन झालेले दिसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर गद्दारीचे आरोप करणाऱ्या आदीत्य ठाकरे यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाते आहे. ठाकरे नावाभोवतीचे वलय साफ संपुष्टात आले आहे काय? असा सवाल निर्माण करणारा हा घटनाक्रम आहे.