फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद चार महीन्यात जाणार? | Dinesh Kanji | Uttam Jankar | Mahayuti | Supriya

फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद चार महीन्यात जाणार? | Dinesh Kanji | Uttam Jankar | Mahayuti | Supriya

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुतीला जनतेने उदंड यश दिले. गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्रीपदी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी महायुती २०० चा आकडा सहज ओलांडेल, असा विश्वास व्यक्त केला होता. तो महाराष्ट्राच्या जनतेने सार्थ ठरवला. महायुतीला असे ऐतिहासिक यश मिळाल्यानंतरही हे सरकार केवळ चार महीने टीकणार आहे. फडणवीस फक्त चार महीने मुख्यमंत्री पदावर राहणार आहे. गेली काही दशके मराठी चाय-बिस्कुट मीडियाने ज्यांची प्रतिमा तेल लावलेला पहीलवान, वस्ताद, वगैरे वगैरे रुपात रंगवलेली आहे, ते शरद पवार पुन्हा काही जबरदस्त खेळी करणार आहेत का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. पवारांचा एक अदनासा, बारीकसा, अडगळीत पडलेला एक मोहरा ही क्रांती घडवणार आहे.

Exit mobile version