महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यात गेली अडीच वर्षे वसूलीचा एक कलमी कार्यक्रम राबवण्यात येत होता. सध्या तुरुंगात असलेले मविआचे तीन नेते या भ्रष्टाचाराचा पुरावा आहेत. मविआच्या राजवटीत नेत्यांच्या जेलवारीचा शुभारंभ झाला तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापासून. त्यानंतर अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नबाव मलिक यांनी ऑर्थररोड तुरुंगात नंबर लावला. त्यांच्या पाठोपाठ आले शिवसेना नेते, खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत.