शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर काल बुधवारी ED ने केलेल्या छापेमारीत श्रद्धा लँडमार्क आणि अवनी इंन्फ्रा या बांधकाम कंपन्यांवर छापेमारी केली. अवनीमध्ये तर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा आणि प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी या संचालक आहेत. परंतु श्रद्धा लँड मार्कशी संजय राऊत यांचा कागदोपत्री तरी काही संबंध नाही. परंतु, राऊत वापरत असलेल्या दोन महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर या कंपनी मालकीच्या असल्याचे उघड झाले आहे. या कंपनीचा पसारा मोठा आहे. ठाणे, मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीत मिळून या कंपनीचे किमान १२ बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. यातील बहुतेक प्रकल्प विक्रोळीत सुरू असून त्यात बऱ्याचशा उत्तुंग टॉवरचा समावेश आहे. ही गुंतवणूक काही शे कोटींची आहे.