गायब करण्याचे कर्म कोणाचे ? मुंबईत होणाऱ्या डेंग्यू, मलेरीया आदी पावसाळी आजारावर औषधे खरेदी करण्यासाठी एक फाईल तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांना पाठवण्यात आली होती. सततच्या पाठपुराव्यानंतरही महापौर बाईंनी बराच काळ या फाईलवर सही केली नाही. अचानक एक दिवस ही फाईल आश्चर्यकारकरीत्या गायब झाली. हे प्रकरण म्हणजे शिवसेनेच्या कारभाराचा इरसाल नमुना आहे. महापालिकेच्या कडेकोट बंदोबंस्तातून ही फाईल गायब करण्याचे कर्म कोणाचे याचा तपास पोलिस गेले वर्षभर करतायत, पण त्यातून निष्पन्न मात्र काहीही होताना दिसत नाही.